पेठवडगाव:प्रवाशाचे ब्यागेतील एक लाख वीस हजार चोरी.

पेठवडगाव:प्रवाशाचे ब्यागेतील एक लाख वीस हजार चोरी.

एसटीमधून प्रवास
करताना एक लाख
२० हजार चोरले

पेठवडगाव : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे बॅगेतील एक लाख वीस हजार व साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. रामचंद्र कस्तुरे हे हॉटेल कामगार आहेत. त्यांची पत्नी अर्चना कस्तुरे यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या उपचारासाठी त्यांनी जमविलेले १ लाख २० हजार रुपये घेऊन ते मलकापूर-इचलकरंजी एसटी बसने भेंडवडे येथे पत्नीकडे चालले होते. ही बॅग पुढच्या सिटखाली ठेवली होती. ती प्रवासादरम्यान अज्ञात चोरटा चालकाकडून मागून घेऊन पसार झाला. पेठवडगाव येथे स्टँडवर उतरताना त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला. एवढ्यात चोरटा बॅग घेऊन पसार झाला होता. ही घटना स्टॅंडवरील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. याची नोंद आज वडगाव पोलिस ठाण्यात झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com