पेठवडगाव:आपघातात एक ठार

पेठवडगाव:आपघातात एक ठार

Published on

फोटो- 02423

अज्ञात वाहनाच्या
धडकेत एकजण ठार

पेठवडगाव, ता. ६ : वडगाव-कोल्हापूर रस्त्यावर महालक्ष्मी मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत येथील एकजण ठार झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ५) रात्री दहा वाजता घडली. नेताजी मधुकर गुरव (वय ५२, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट) असे मृताचे नाव आहे.
नेताजी गुरव हे वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात फायरमन म्हणून सेवेत होते. ते दुचाकीवरून (एमएच ०९ सीके ९०९३) कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये त्यांना डोक्यास गंभीर दुखापत झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळपासच्या नागरिकांनी पहिल्यांदा खासगी रुग्णालयात, त्यानंतर सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले; परंतु रात्री अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी त्यांचा भाऊ विश्‍वास गुरव यांनी दिली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या अपघाताची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.