चव्हाणवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चव्हाणवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन.
चव्हाणवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन.

चव्हाणवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन.

sakal_logo
By

03523
चव्हाणवाडी ः खेळाडूंचा सत्कार करताना शिक्षकवर्ग.

चव्हाणवाडीत बालिका दिन
पुनाळ : चव्हाणवाडी (ता. पन्हाळा) केंद्रशाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन विविध उपक्रमांनी केला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष चव्हाण, पालक राजाराम चव्हाण, केंद्रप्रमुख किरण सुतार, केंद्रमुख्याध्यापक अशोक पाटील यांच्या हस्ते फुले प्रतिमेचे पूजन झाले. बालिका दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय खो-खो खेळाडू संचिता चव्हाण व राष्ट्रीय तिरंदाज स्पर्धा खेळाडू अपूर्वा चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी केंद्रमुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांनी दोन्हींच्या खेळाचा पाया केंद्रशाळा चव्हाणवाडी शाळेतच घातल्याचे सांगितले. सर्व मुली सावित्रीबाईंची वेशभूषा करुन आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख भाषणातून करुन दिली. बालिका दिनानिमित्ताने शाळेत रांगोळी स्पर्धा झाल्या. अनुष्का बुवा, सारिका चव्हाण, संज्योत चव्हाण व काजल यादव यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला सतीश बुवा, शुभांगी खोत उपस्थित होते. सर्जेराव जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन, उत्तम कोरवी यांनी आभार मानले.