वहिवाटीचा रस्ता खुला करण्याबाबत तहसिलदारांना निवेदन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वहिवाटीचा रस्ता खुला करण्याबाबत तहसिलदारांना निवेदन.
वहिवाटीचा रस्ता खुला करण्याबाबत तहसिलदारांना निवेदन.

वहिवाटीचा रस्ता खुला करण्याबाबत तहसिलदारांना निवेदन.

sakal_logo
By

03532
पुनाळ ः कुंपण घालून अडविलेला रस्ता.
----------

वहिवाटीचा रस्ता खुला करण्याबाबत निवेदन
पुनाळ, ता. ५ : येथील नदीकाठचा सार्वजनिक रस्ता शेतकऱ्याने अडविला आहे. तो रस्ता खुला करावा यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले. निवेदनातील आशय असा, कासारी नदीकाठी दत्ताची पाणंद रस्त्यावर आमच्या जमिनी आहेत. त्या शेतातील ऊस बाहेर काढण्यासाठी १९८७ मध्ये कुंभी कारखान्याने रस्ता करुन खडीकरण केले होते. २७ गटनंबरमध्ये सहहिस्सेदार मधुकर पांडुरंग मगदूम व त्यांचा मुलगा महेश मधुकर मगदूम यांनी वैयक्तिक आकसापोटी रस्ता अडविला आहे. महिनाभर सांगूनही न ऐकता कुंपण लावले आहे. याबाबत विचारणा केली असता दादागिरी केली. अधिक अंतरावर ऊस बाहेर काढणे अशक्य आहे. त्यामुळे रस्त्यावरील कुंपण काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत तहसीलदारांना विनंती करत आहोत. निवेदनावर शामराव मगदूम, हिंदूराव मगदूम, सुरेश मगदूम, दीपक मगदूम, प्रकाश मगदूम, अशोक मगदूम, धोंडीराम मगदूम, केरबा चोपडे, रामचंद्र मगदूम, सर्जेराव मगदूम, आनंदा मगदूम, कृष्णात मगदूम, दगडू चोपडे, नंदकुमार मगदूम, प्रवीण चव्हाण, श्रीधर चव्हाण, सागर चव्हाण यांच्या सह्या आहेत.