Sun, Jan 29, 2023

पुनाळच्या हनुमान दूध संस्थेसाठी ऊद्या मतदान:दुरंगी लढत
पुनाळच्या हनुमान दूध संस्थेसाठी ऊद्या मतदान:दुरंगी लढत
Published on : 10 January 2023, 4:33 am
पुनाळच्या हनुमान दूध संस्थेसाठी आज मतदान
पुनाळ : येथील हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेसाठी बुधवारी (ता. ११) मतदान व सायंकाळी मतमोजणी होणार आहे. श्री. हनुमान सत्तारुढ पॅनेलच्या विरुद्ध श्री हनुमान परिवर्तन विकास आघाडी निवडणूक रिंगणात आहे. सत्तारूढ ‘कपबशी’ तर विरोधक ‘विमान’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. संस्थेचे एकूण ४२३ सभासद आहेत. सत्तारूढ गटाचे भटक्या विमुक्त जाती विभागातून रवींद्र आनंदा वडर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दहा जागांसाठी वीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सत्तारूढ गटात सात विद्यमान संचालक असून, विरोधी गटाने सर्व नवीन उमेदवार दिले आहेत.