हनुमान दूध संस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम चव्हाण. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनुमान दूध संस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम चव्हाण.
हनुमान दूध संस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम चव्हाण.

हनुमान दूध संस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम चव्हाण.

sakal_logo
By

बामणी ग्रामपंचायतीची
‘कर भरा पैठणी जिंका’ योजना

सिद्धनेर्ली ः बामणी (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीकडून ‘कर भरा पैठणी जिंका’ अशी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली आहे, अशी माहिती सरपंच अनुराधा पाटील, उपसरपंच भिवाजी रेंदाळ व ग्रामसेवक संग्राम खाडे यांनी दिली. सरपंच पाटील म्हणाल्या, ‘ग्रामपंचायतीकडील कर भरणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागते. वसुलीसाठी ग्रामस्थांचा कटूपणा न घेता अशा प्रोत्साहन योजनेतून वसुलीचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी खर्च ग्रामपंचायतीवर न टाकता सरपंच व सदस्य यांच्याकडून केला जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात तीन याप्रमाणे तीन वॉर्डातील नऊ नागरिकांना पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. ३१ मार्च २०२३ अखेर ग्रामपंचायतीकडील घरफाळा व पाणीपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी ही योजना आहे. या बक्षीस योजनेचा ड्रॉ आठ मार्च रोजी जागतिक महिलादिनी काढून त्याचदिवशी करधारक विजेत्यांच्या कुटुंबातील महिलांना पैठणी वितरण करण्यात येईल.’ यावेळी सदस्य सुप्रिया बाबर, रेश्मा मगदूम, रोहिणी कांबळे, किरण मगदूम, संतोष कुंभार, आनंदा पाटील, कोमल बुवा, सुनीता पाटील उपस्थित होते.

.....
....
03615, 3616

पुनाळच्या हनुमान दूध संस्थेच्या
अध्यक्षपदी राजाराम चव्हाण

पुनाळ : येथील हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये चंद्रदीप नरके गटाने एकहाती सत्ता मिळवली. संस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम बाजीराव चव्हाण व उपाध्यक्षपदी हिंदूराव शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षपदी निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. चिकणे होते. अध्यक्षपदासाठी राजाराम चव्हाण यांचे नाव विश्वास साळोखे यांनी सुचविले. उपाध्यक्षपदी हिंदूराव पाटील यांचे नाव वसंत चव्हाण यांनी सुचविले. यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र चौगले, वसंत चव्हाण, कृष्णात चौगले, शहाजी चौगले, हिंदूराव मगदूम, विश्वास साळोखे, मनीषा कारंडे, सुमन पाटील, कृष्णात कांबळे, रवींद्र वडर आदी संचालक उपस्थित होते. सचिव बापू डवंग यांनी आभार मानले.
...
.....

2934
माजगावः परिसरात मोर-लांडोर पिकांचे उगवून आलेले कोवळे मोड फस्त करत आहेत.


पन्हाळा तालुक्यात मोर-लांडोर पक्षी व वानरापासून पिकांचे नकुसान

माजगाव ः पन्हाळा तालुक्यात मोर-लांडोर पक्ष्यांबरोबरच वानरांची संख्या लक्षणीय वाढली आहे. हे पक्षी आणि वानरे शेतकऱ्यांची पिके फस्त करत आहेत. सततच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला असून, वनखात्याने यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. या परिसरात कासारी नदीला बारमाही मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे येथील शेतकरी प्रामुख्याने ऊस पीक घेतात. ऊस गाळपाला गेल्यानंतर खोडव्यात तसेच ऊस लागणीत आंतरपीक म्हणून शेतकरी मका, सूर्यफूल, कलिंगडासह विविध भाजीपाला घेतात. त्यामुळे या परिसरात मोर-लांडोर पक्ष्यांसह वानरांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. तसेच झाडाझुडुपांमध्ये सुरक्षितता असल्याने मोर-लांडोरींची संख्या लक्षणीय वाढली आहे. हे पक्षी पेरणी केलेल्या पिकांचे दाणे आणि नुकतेच उगवून आलेल्या पिकांचे कोवळे मोड फस्त करतात, तर वानरे मक्याची कणसे, भाजीपाला, फळे खाऊन नासधूस करतात.

....