कोतोलीत इंग्रजी भाषेचे महत्त्व विषयावर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोलीत इंग्रजी भाषेचे महत्त्व विषयावर व्याख्यान
कोतोलीत इंग्रजी भाषेचे महत्त्व विषयावर व्याख्यान

कोतोलीत इंग्रजी भाषेचे महत्त्व विषयावर व्याख्यान

sakal_logo
By

कोतोलीत ‘इंग्रजीचे महत्त्व’वर व्याख्यान
पुनाळ : श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली (ता. पन्हाळा) येथे इंग्रजी विभागामार्फत ‘इंग्रजी भाषेचे महत्त्व’वर व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्र-प्राचार्य डॉ. व्ही. पी. पाटील होत्या. लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग व रीडिंगचा सराव नियमितपणे करावा. जेणेकरून आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये इंग्रजी बोलणे सुलभ होईल. त्याचबरोबर दररोज नियमित वर्तमानपत्र वाचन करणे, इंग्लिश मूव्हीज पाहणे आणि डे टु डे लाईफ मध्ये इंग्रजी वाचता, लिहिता, बोलता येणे गरजेचे आहे. इंग्रजीची भीती काढून टाकली तरच इंग्रजीत प्रावीण्य मिळवू शकतो, असे मत घोटवडे ज्युनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास सचिव शिवाजीराव पाटील, ज्युनिअर विभागप्रमुख डॉ. उषा पवार, डॉ. बी. एन. रावण, डॉ. एस. एस. कांबळे होते. एच. एस. शिरसट यांनी प्रास्ताविक व स्वागत तर डॉ. एस. एस. कांबळे यांनी आभार मानले.