ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विविध गुणदर्शन सोहळा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विविध गुणदर्शन सोहळा.
ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विविध गुणदर्शन सोहळा.

ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विविध गुणदर्शन सोहळा.

sakal_logo
By

ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विविध गुणदर्शन
पुनाळ : बोरगाव (ता. पन्हाळा) येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये विविध गुणदर्शन सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून चव्हाणवाडीचे सरपंच सुहास गौड उपस्थित होते. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. त्यामध्ये नृत्य, कथाकथन, यांसारख्या कार्यक्रमांची मेजवानी होती. दहावीच्या विद्यार्थ्यांचा फनी डान्स व चंद्रा लावणी डान्स करण्यात आला. विद्यालयाचे सहा. शिक्षक, डी. एस. चव्हाण, डी. एस. कुटे, माधव कांबळे, सागर कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी, बबन कांबळे, भाऊसो पर्वते यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक डी. एस. लवटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रमिला चिखलकर, राजवी चौगुले, प्रगती पाटील यांनी केले.