आनंदी फार्मसी चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर .

आनंदी फार्मसी चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर .
Published on

05397

कुडित्रेत आनंदी फार्मसीचे
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
पुनाळ, ता. १८ : कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आनंदी फार्मसी कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर कुडित्रे (ता. करवीर) येथे झाले. सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन कुडित्रेच्या उपसरपंच भारती आनंदा पाटील व आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई यांच्याहस्ते झाले. शिबिरांतर्गत सेंद्रिय शेती, आत्महत्या आणि सामाजिक व्यथा, मधुमेह समज गैरसमज, उपचार तसेच महिला समस्या आणि भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल व युवक या विषयावर मार्गदर्शन झाले. नंदादीप नेत्रालयामार्फत डोळे तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, आजारासंबंधी माहिती संकलन व वृक्षगणना, पथनाट्य यावर विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. शिबिरात पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शिबिर यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. सुरेश किल्लेदार, उपप्राचार्य डॉ . राहुल आडनाईक , राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक श्रद्धा नाईक, महिला कार्यक्रमाधिकारी वैष्णवी परीट यांचे योगदान लाभले. यावेळी उपसरपंच भारती पाटील, अजित पाटील, सुवर्णा चौगुले, शीतल खेडकर, तानाजी शेलार, बाजीराव शेलार, महादेव माळी, अमित पाटील, मनोहर पाटील, रघुनाथ शेलार, सरदार पाटील, सागर पाटील, दत्तात्रय तोरस्कर, अजित पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com