गावगाड्यातील नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद.

गावगाड्यातील नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद.
Published on

05418

पुनाळला गावगाड्यातील नाटकाला प्रतिसाद
पुनाळ, ता. ४ : येथील संगीत नाटक मंडळाचे हौशी कलाकारांनी महाशिवरात्रीनिमित्त केलेल्या नाटकाच्या सादरीकरणास ग्रामस्थ व परिसरातील रसिक प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
वीर जोत्याजी केसरकरांच्या पावनभूमीत गेली बासष्ठ वर्षे पुनाळमध्ये कला जोपासण्याचे काम स्थानिक कलाकार करत आहेत. शेती, नोकरी, व्यवसायाचा व्याप सांभाळत स्थानिक कलाकार व रील स्टार प्रणाली राऊत यांच्या प्रमुख भूमिकांनी नाटकांमध्ये रंगत भरली. लेखक अशोक रास्ते लिखित ‘पुढारी दोन, खुनी कोण?’ या तीन अंकी नाटकाचे उद्घाटन सरपंच बाजीराव झेंडे यांच्या हस्ते व माजी सरपंच युवराज पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शामराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चौगले, लेखक शहाजी बाडे, मुख्याध्यापक तानाजी घरपणकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत कलाकारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दिग्दर्शक रंगराव कारंडे, मार्गदर्शक आनंदा पाटील, निर्माता सरदार केसरकर यांच्या सहकार्याने सामाजिक राजकीय, प्रबोधनात्मक नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
यासाठी कळे पोलिस स्टेशन, राजर्षी शाहू मंडळ कळे, साधना हायस्कूल, शंकरराव चव्हाण केंद्रशाळा, समर्थ बहुउद्देशीय संस्था मरळी, नंदू चौगले, रामदास शिंदे, राजू तोरस्कर, संभाजी बाडे, रवींद्र चौगले, संजय कारंडे , सरदार बाडे, सरदार झेंडे,श्याम पठाण, सर्जेराव पाटील, श्रीपती पाटील, पांडुरंग कुंभार, उत्तम गुरव, सर्जेराव ढेकणे, कृष्णात मगदूम, कृष्णात तोरस्कर, श्रेयश कोंडेकर, संग्राम पाटील, तनिष्का चौधरी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सरदार केसरकर यांनी सुत्रसंचालन केले. धनाजी पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com