जैन समाजातर्फे रांगोळीत कँडल मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन समाजातर्फे रांगोळीत कँडल मार्च
जैन समाजातर्फे रांगोळीत कँडल मार्च

जैन समाजातर्फे रांगोळीत कँडल मार्च

sakal_logo
By

जैन समाजातर्फे
रांगोळीत कँडल मार्च
रांगोळी, ता. २ ः शिखरजीस दिलेला पर्यटन स्थळाचा दर्जा रद्द करावा या मागणीसाठी जैन समाजातर्फे गावातून कॅँडल मार्च व मूक मोर्चा काढला. झारखंड राज्य शासनातर्फे शिखरजीला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे. यामुळे देशभरातील जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य व स्वातंत्र्य अबाधित राहावे. यासाठी आज जैन समाजातर्फे गावातुन हातामध्ये मेणबती घेऊन व घोषणाबाजी न करता मूक मोर्चा काढला. जैन बस्तीपासून मूक मोर्चाला सुरूवात झाली. गावातुन फेरी काढून परत जैन बस्ती येथे सांगता केली. जैन धर्मिय बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.