मुल्लाणीवाडीत रस्ता कामास प्रारंभ

मुल्लाणीवाडीत रस्ता कामास प्रारंभ

00395
---------
00396
रांगोळी ः येथील मुल्लाणीवाडी रस्ताकामास सुरुवात करण्यात आली.
-----------
मुल्लाणीवाडीत रस्ताकामास प्रारंभ
रांगोळी, ता. १४ ः येथील मुल्लाणीवाडी वसाहतीकडे जाणारा रस्ता अतिक्रमण व झाडझुडपांमुळे अरुंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडचणीचा ठरत होता. आता या रस्त्यावरील अतिक्रमण व झाडेझुडपे काढून रस्ता करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
‘सकाळ’ने मुल्लाणीवाडी रस्ता रुंदीकरण व अतिक्रमणांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर ग्रामपंचायतीतर्फे रस्त्यास अडचण ठरणारी अतिक्रमणे काढून रस्ता करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी याबाबत ‘सकाळ’च्या वृत्ताचे कौतुक केले. कित्येक वर्षे हा रस्ता अतिक्रमण व शेतकऱ्यांच्या वादामुळे होऊ शकला नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांना वाहतुकीस अडचणीचा ठरत होता. एखादे वाहन पास करताना अर्धा किलोमीटरवर थांबावे लागत असे. याबाबात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. सरपंच संगीता नरदे, उपसरपंच सविता मोरे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सूर्यवंशी, सुदर्शन पाटील, हुमायून मुल्लाणी, सुभाष नरदे, रणजित कमते, विनय मोरे, ग्रामसेवक कुमार वंजीरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com