रेंदाळ येथे नऊ डिसेंबरपासून  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

रेंदाळ येथे नऊ डिसेंबरपासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Published on

रांगोळी : येथील न्यू ग्लिश स्कूलमध्ये ९ ते १० डिसेंबरला हातकणंगले तालुकास्तरीय ५२ वे विज्ञान प्रदर्शन, नवभारत साक्षरता अभियान व केंद्र सरकार पुरस्कृत तालुकास्तरीय उल्हास मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात तालुक्यातील शाळांनी सह‌भाग घेण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी रविंद्र चौगुले यांनी केले आहे.
हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनियर कॉलेज रेंदाळ यांच्या संयुक्त विध्यमानाने तालुकास्तरीय ५२ वे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा आहे. याशिवाय आरोग्य, जीवन, शेती, दळणवळण वाहतूक व संगणकीय विचार असे पाच उपविषय प्रदर्शनात आहेत. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक स्तर सहावी ते आठवी,माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर नववी ते बारावी तसेच अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनासाठी नववी ते बारावी माध्यमिक शिक्षक,पहिली ते आठवी प्राथमिक शिक्षक,प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर,दिव्यांग असे गट केले आहेत.
नऊ डिसेंबर रोजी सकाळी नाव नोंदणी,उद्‌घाटन व वैज्ञानिक साहित्याचे परीक्षण होणार आहे.दहा डिसेंबर रोजी परीक्षण व बक्षिस वितरण कार्यक्रम होणार आहे.विज्ञान प्रदर्शनासाठी हातकणंगले तालुक्याचे उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे,विस्तार अधिकारी भारती कोळी,हुपरी केंद्रप्रमुख भारत पाटील,तालुका विज्ञान समितीचे प्रमुख सागर चुडाप्पा,अध्यक्ष सचिन कोंडेकर, सर्वसंघटनांचे पदाधिकारी,सर्व केंद्रप्रमुख,शालेय व्यवस्थापन समिती रेंदाळ,समन्वय राजीव कोरे,हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वृंदा पाटील यांचे वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील सर्व शाळांनी सह‌भाग घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी रविंद्र चौगुले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com