दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी रूकडीतून निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी रूकडीतून निवेदन
दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी रूकडीतून निवेदन

दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी रूकडीतून निवेदन

sakal_logo
By

01670
कोल्हापूर ः येथे दीपक घाटे यांना निवेदन देताना माजी उपसरपंच शीतल खोत, राजू ढोले, दिलीप इंगळे आदी.
-----------
दिव्यांगांच्या मागण्यांबाबत
‘समाजकल्याण’ला निवेदन
रूकडी, ता. ७ : दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर समाजकल्याण विभागाकडे निवेदन देण्यात आले. दिव्यांग सहयोगी कल्याण सेवाभावी संस्था, रूकडीमार्फत माजी उपसरपंच शीतल खोत यांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभासाठी निवेदन देण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सुरक्षितता व आर्थिक बळकटी मिळण्यासाठी आरक्षण व सवलती प्राप्त करून द्यावेत. आर्थिकदृष्ट्या दिव्यांग सक्षम होण्यासाठी व्हेन्डिंग स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशीन, फूड प्रोसेसिंग युनिट, झेरॉक्स मशीन असे विविध उद्योग तसेच व्यवसाय प्रशिक्षण मिळावे. शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती मिळावी, कर्णबधिर अपंग व्यक्तींना कॉक्लियर इम्प्लांटसाठीअर्थसहाय्य मिळावे.अशा मागण्यांचे निवेदन समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांना दिले. अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी संस्थाध्यक्ष राजू ढोले, उपाध्यक्ष राजू बागडी, दिलीप इंगळे, जॉन फर्नांडिस, साहिल कलावंत, रणजित गायकवाड, कृष्णात माळी, नामदेव गायकवाड, अमरीश फर्नांडिस, ज्ञानदेव पोल, पीयूष जाधव, मिलिंद कांबळे, सुदर्शन पाटील, अशोक परीट व दिव्यांगबांधव उपस्थित होते.