दीड लाख दुर्मिळ नाणी, नोटांचा संग्रह

दीड लाख दुर्मिळ नाणी, नोटांचा संग्रह

02384
02386
जुन्या नाण्यांचा केलेला संग्रह.व
02385
भरत उपाध्ये

दीड लाख दुर्मिळ नाणी, नोटांचा संग्रह
भरत उपाध्ये यांच्याकडे स्वातंत्र्यानंतर चलनात आलेल्या सर्व नोटा
सकाळ वृत्तसेवा
रुकडी, ता. १० : प्राचीन नाणी आणि नोटांचा संग्रह येथील भरत उपाध्ये यांनी केला आहे. सुमारे दीड लाख दुर्मिळ नाणी व नोटा त्यांच्या संग्रहात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रिझर्व बँकेचे जितके गव्हर्नर झाले. त्यांनी चलनात आणलेल्या सर्व नोटा उपाध्ये यांच्याकडे आहेत.
उपाध्ये हे सध्या पुणे येथे बिल्डिंग पेंटिंग ठेकेदार आहेत. त्यांच्याकडे भारतीय नाण्यांची आणि नोटांची परंपरा, डिझाईन, रिझर्व बँकेने निर्माण केलेली सर्व चलने संग्रहित आहेत. हडप्पा, मोहेंजोदडो, बुद्धकालीन, अकबर ते औरंगजेब, शिवकालीन नाणी अभ्यासासाठी जितकी महत्त्वपूर्ण ठरली आहेत. तितकीच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्माण झालेली नाणीसुद्धा प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मुंबई, बंगलोर, जयपूर, पुणे आदी ठिकाणी त्यांनी ही नाणी प्रदर्शनात मांडली आहेत.
जॉर्ज किंग्ज, गोरगेज यांची छायाचित्रे असलेली एक रुपयांपासूनच्या नोटांचा यात समावेश आहे. नेपाळ व अरब देशाची काही चलने आहेत. तसेच २५ पैसे, ५० पैशांची तीन ते चार प्रकारची नाणी आहेत. एक रुपया, दोन, पाच व दहा रुपयांची व स्टीलची सर्व नाणी त्यांच्याकडे आहेत. जुना ठोकळा पद्धतीचा एक रुपया, षटकोनी आकाराचा सहा व नऊ ग्रॅमचा एक रुपया आहे. तांबे, पितळाची १० पैशाची गोल नाणी, चांदीचे शिक्केही त्यांच्याकडे पहावयास मिळतात.
-----------------
मी केवळ छंद जोपासला आहे. भविष्यात मुलांना जुनी नाणी समजावीत तसेच, त्या नाण्यांचे मूल्य समजावे. त्यावर असलेल्या प्रत्येक खुणांचा अभ्यास सर्वांनी करावा. पूर्वी पाच पैशांचे मोठे महत्व होते. आज शंभराच्या नोटेचे महत्त्वही मुलांना राहिले नाही. जुन्या नाण्यांचा मी शोध घेत असतो. अभ्यास करतो. नाण्यांचे अल्बम तयार केले आहेत. काहिंनी माझा छंद पाहून मला नाणी विनामूल्य दिली आहेत. कोल्हापूर, मुंबई अशा अनेक ठिकाणांहून नाणी जमा केली आहेत. अनेक किराणा दुकानदारांकडून नाणी जमा केली आहेत.
-भरत उपाध्ये, रुकडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com