

चोकाक ते अंकलीपर्यंतच्या
गावांना चौपट भरपाई
द्या ः धैर्यशील माने
हेरले : ‘रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या महामार्गावर असणाऱ्या चोकाक ते अंकलीपर्यंतच्या गावांना दुप्पट भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे, हा येथील नागरिक व शेतकऱ्यांवर अन्याय आहे. केंद्र सरकारने येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना चौपट भरपाई द्यावी, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार धैर्यशील माने यांनी केली.
खासदार माने म्हणाले, ‘काँग्रेसच्या काळात ६० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकर माफ होता. मात्र मोदी सरकारने १२ लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्यांना आयकर माफ करून सामान्य जनतेला न्याय दिला आहे. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, यासाठी पारदर्शक निधी निर्माण करण्यासाठी करप्रणाली सुलभ करण्याची गरज आहे. परंतु शेतकऱ्यांवरील भार आणखी कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.