
रुईत ४२ घरकुलांसाठी ५० लाखांचा निधी
00128
रुई ः येथील ग्रामपंचायतीतर्फे लाभार्थ्यांना मंजुरीच्या आदेशपत्रांचे वाटप करण्यात आले.
--------
रुईत ४२ घरकुलांसाठी ५० लाखांचा निधी
ग्रामपंचायतीच्यावतीने पात्र लाभार्थ्यांना मंजूर आदेशपत्रांचे वाटप
रुई, ता. २४ ः येथील पात्र ४२ लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठी ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. रुई ग्रामपंचायतीतर्फे संबंधित लाभार्थ्यांना निधी मंजूर आदेशपत्रांचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३७, तर रमाई घरकुल योजनेंतर्गत ५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला १ लाख २० हजार रुपये मिळणार असून एकूण ४२ घरकुलांसाठी ५० लाख ४० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. कांबळे यांचे सहकार्य लाभले. पात्र लाभार्थ्यांना उपसरपंच युनूस मकानदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते मंजूरपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी अभय काश्मिरे, जितेंद्र यादव, सुभाष चौगुले, दीपक उपाध्ये आदी उपस्थित होते.