उपसरपंच निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंच निवड
उपसरपंच निवड

उपसरपंच निवड

sakal_logo
By

02020
मांडरे उपसरपंचपदी भरत किरुळकर
शिरोली दुमाला : मांडरे (ता. करवीर) उपसरपंचपदी भरत भगवान किरुळकर यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कृष्णात सुतार होते. निवडणूक निर्णय अधिकारी संग्राम भोसले यांच्या उपस्थितीत निवड झाली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार झाला. यावेळी ग्रामसेवक शरद पाटील, पंढरी पाटील, राजाराम जगताप, वंदना कांबळे, संपदा पाटील, छाया रोटे, मुक्ताबाई सुतार, विष्णू पाटील, नामदेव भावके, वाय. डी. पाटील, आबासो पाटील, गोपाळ कांबळे, रंगराव पाटील, सदाशिव पाटील, यशवंत पाटील उपस्थित होते.