पूरग्रस्थ बालिंगा

पूरग्रस्थ बालिंगा

Published on

बालिंगा येथे ७० पूरग्रस्तांना स्थलांतराच्या नोटिसा

बालिंगा, ता. २६ : संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बालिंगा (ता. करवीर) गावातील ७० कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटीसा ग्रामपंचायतमार्फत देण्यात आल्या आहेत.
यामध्ये पूरग्रस्तांनी महापुराचे वाढता पाण्याचा प्रवाह पाहता तातडीने स्थलांतर व्हावे, अशा सूचना सरपंच पूजा विजय जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे व ग्रामविकास अधिकारी रमेश कारंडे यांनी दिल्या आहेत. बालिंगा गाव भोगावती नदी तीरावर वसले आहे. यामधील शाहू वसाहत तसेच कात्यायनी वसाहत या वस्तीत पुराचे पाणी शिरते. यापूर्वी सन २०१९ व २०२१ साली महापुरामुळे या वस्तीतील रहिवाशी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी ही महापूर येण्याची शक्यता असल्यामुळे ग्रामपंचायत मार्फत ७० कुटुंबियांना प्रापंचिक साहित्य सुरक्षित ठेऊन स्थलांतरित व्हावे, अशी नोटीस सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्या सहीने पाठवल्या आहेत. पूरग्रस्तांना राहण्याची सोय प्राथमिक शाळा, हायस्कूल व अन्य ठिकाणी करण्यात आली आहे. अशी माहिती सरपंच पूजा जांभळे व उपसरपंच पंकज कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.