
पान ७
02636
सर्व्हिसिंग सेंटर चालकाचा
मुलगा मोटार वाहन निरीक्षक
सिद्धनेर्लीच्या अक्षय पाटील यांचे यश
सिद्धनेर्ली, ता. ९ ः येथील सर्व्हिसिंग सेंटर चालकाच्या मुलग्याची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली. अक्षय लक्ष्मण पाटील असे त्याचे नाव आहे. खासगी शिकवणीशिवाय जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नियुक्तीचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांचे त्याला पत्र नुकतेच मिळाले.
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर सिद्धनेर्ली विद्यालयात माध्यमिक शिक्षण झालेल्या अक्षयने बारावीनंतर कागलच्या वाय. डी. माने कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका, वाठारच्या अशोकराव माने कॉलेजमध्ये पदवीही घेतली. चार वर्षापासून तो स्पर्धा परीक्षा देत आहे. २०१९ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत ३०० पैकी २४० गुण मिळवले. गुणवत्ता यादीत त्याचा २८ वा क्रमांक आला. कोल्हापुरातील रामानुजन अभ्यासिकेत तो अभ्यास करत होता. परीक्षेचा निकाल गतवर्षीच लागला. काही परीक्षार्थीनी न्यायालयात धाव घेतल्याने नियुक्ती रखडली होती. नियुक्तीबाबतच्या आदेशाने निवडीचा मार्ग मोकळा झाला. अक्षयची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील शेतकरी असून ते सर्व्हिसिंग सेंटर चालवतात.
कामावेळीच गोड बातमी
वडिलांच्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आल्यानंतर तो मदत करे. परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर त्याला निकाल समजला त्यावेळी तो गाडी धुत होता.