करनूर मध्ये लोकवर्गणी व लोकसभागातून दुरुस्त केला रस्ता

करनूर मध्ये लोकवर्गणी व लोकसभागातून दुरुस्त केला रस्ता
Published on

04226
करनूर (ता. कागल) ः येथे घाटगे मळ्याकडे जाणारा रस्ता दुरुस्तीवेळी नागरिक.

--
करनूरमध्ये लोकसभागातून
रस्त्याची केली दुरुस्ती

सिद्धनेर्ली, ता. २ : करनूर (ता. कागल) येथील घाटगे मळ्यातील अर्धा किलोमीटरचा रस्ता नागरिकांनी लोकसहभागातून दुरुस्त केला. मात्र, पन्नासहून अधिक घरे व दोनशेहून अधिक नागरिकांची वस्ती असलेल्या या मळ्याकडे जाणारा हा कच्चा रस्ता पक्का कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
करनूर-वंदूर या मार्गाच्या दक्षिणेला घाटगे मळा नावाची ही वस्ती आहे. करनूर -वंदूर या मुख्य मार्गाला जोडणारा व या वस्तीकडे जाणारा अंदाजे पाचशे ते सहाशे मीटरचा कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावर खाचखळगे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून दलदल निर्माण झाली होती. त्यामुळे येथील नागरिकांना वाहतुकीची गैरसोय झाली होती. या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आठ लाखांचा निधी दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. मात्र, काही कारणांमुळे तो निधी या कामासाठी लागला नाही. त्यामुळे हे काम झाले नाही. नागरिकांना होणारा त्रास पाहून येथील गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसह येथील नागरिक पुढे आले. जयसिंग घाटगे यांनी या रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी २० ट्रॉली मुरूम विनामूल्य दिला, तर हा मुरूम वाहतुकीसाठी शिवाजी साळुंखे, सूरज घाटगे, आदित्य घाटगे, स्वप्नील घाटगे यांनी विना मोबदला ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. गणेश मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी हा मुरूम रस्त्यावर पसरून घेतला. महादेव घाटगे, मोहन साळुंखे, विकास घाटगे, ओंकार घाटगे, सतीश घाटगे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com