सकाळ वृत्तसेवा/ सांगवडेवाडी ता.7

सकाळ वृत्तसेवा/ सांगवडेवाडी ता.7

Published on

30188

देशी गाईचे संवर्धन काळाची गरज
डॉ. नीतेश ओझा; सांगवडेत पंचकल्याण पूजा महोत्सव सुरू

सांगवडेवाडी, ता. ७ ः ‘वर्णसंकरित जनावरांचे दूध आजाराला आमंत्रण देणारे असून देशी गाईच्या दूध, दही, ताक, लोणी, तूप, गोमूत्र व शेण या सर्वच घटकांमध्ये चांगले, उत्तम व निरोगी आरोग्यासाठी लागणारे घटक असल्याने देशी गाईचे जतन आणि संवर्धन काळाची गरज बनली आहे; असे मत डॉ. नीतेश ओझा यांनी व्यक्त केले. सांगवडेतील पंचकल्याण महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ते देशी गाय व आरोग्य विषयावर बोलत होते.
यावेळी आचार्य श्री १०८ दयाऋषी मुनी महाराज व आर्यिका करुणामती माताजी यांचे आशीर्वाचन केले. सहा दिवसीय महामहोत्सवात सकाळी आचार्य श्री १०८ दयाऋषी मुनी महाराज यांच्या सान्निध्यात यजमान बंडा चिपरे व राजमती चिपरे यांच्याहस्ते जैन मंदिरामध्ये विधिवत पूजाअर्चा करून मुख्य मंडपासमोरील ध्वजवंदन प्रदीप येवारे, मंडप उद्घाटन दीपक आळीकट्टे, विधी उद्घाटन संजय अळीकट्टे, कलश स्थापना पासगोंडा पाटील, अखंड दीपप्रज्वलन अण्णासो पाटील, शास्त्र स्थापना हृषीकेश येवारे यांच्याहस्ते झाल्यानंतर पंचकल्याणक महोत्सव सुरू झाला. सकाळी हत्तीवरून मिरवणुकीने मंगलकुंभ आणण्याचा मान सुरेश आडके व वृषभ कोकिळे यांनी घेतला. सायंकाळी हत्तीवरून मिरवणुकीचा मान बाळासो भबान व शीतल वाळवे यांनी घेतला.
पंचकल्याण पूजा महोत्सवात सांगवडेसह पंचक्रोशीतील जैन श्रावक, नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com