सांगवडेवाडी ता 7

सांगवडेवाडी ता 7
Published on

01679
सांगवडेवाडीत कुंकुमार्चन सोहळा
सांगवडेवाडी, ता. ७ ः सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील जकुबाई मंदिरामध्ये सुरू असलेल्या चांदीचा मुखवटा व सिंहासन प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामधील कुंकुमार्चन सोहळ्यामध्ये ७०० महिलांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे मंदिर आणि मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती पुण्याहवाचन, देवत स्थापना,श्री दुर्गा सप्तशती पठण, अग्निस्थापना, देवता हवन इ पूजेचा सन्मान सपत्निक सुदर्शन खोत, प्रकाश खुडे, गजानन खुडे, विलास खोचगे, सागर हुजरे, दादा पाटील सांगवडे, विशाल पाटील हुपरी या भाविकांना मिळाला. दुपारी १३५ कुमारीका पूजन होऊन ‘श्रीं चा जलाविधास करण्यात आला. तिसऱ्या दिवशी सकाळी पीठस्थ देवता पूजन, देवता हवन व चंडी होम, श्री देवी मूर्तीस अष्टांगस्नान, दुपारी श्री कुंकुमार्चन सोहळ्यासाठी ७०० महिलांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर श्रीं चा शयनाधिवास विधी झाला. पूजाविधीचा सपत्नीक सन्मान अशोक समगे, सनी खोत, सौरभ खोत, प्रशांत मोरे, संतोष म्हालदार, सोमनाथ हुजरे, बाबासो खोत यांना मिळाला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व समाजातील महिलांनी गारव्याच्या स्वरूपामध्ये भाकरी, पिठलं, उसळ, ठोंबरा, आंबील केळी, खाजा, लाडू इत्यादी पदार्थ देवीला अर्पण केले. मातंग समाजातील महिलांनी वाजतगाजत गारवा देवीस अर्पण केला. चांदीचा मुखवटा व सिंहासन प्रतिष्ठापना सोहळ्यात आमदार सतेज पाटील व आमदार अमल महाडिक यांनी सदिच्छा भेट दिली. होम विधीचा लाभ घेण्यासाठी मंदिरात अनेक भाविकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com