सांगवडेवाडी ता 13/2/25

सांगवडेवाडी ता 13/2/25

Published on

शैक्षणिक खेळण्यांचे
सांगवडेत वाटप
सांगवडेवाडी ता. १४ : सांगवडे (ता. करवीर) येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ४६ माता गटांना शैक्षणिक खेळणी मोफत वाटप करण्यात आले.
सांगवडे ता. करवीर येथे झालेल्या या कार्यक्रमात बोलताना सरपंच रूपाली कुंभार म्हणाल्या, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात भविष्यात चांगली पिढी घडवायचे असेल तर मोबाईल ऐवजी शैक्षणिक खेळणी मातांनी मुलांना दिली पाहिजे तरच भावी पिढी आदर्श घडेल. यावेळी त्यांनी प्रथम संस्थेच्या कार्याचे कौतुक ही केले.
समन्वक विद्या कांचनवाडकर म्हणाल्या, प्रत्येक गटामध्ये पाच ते सहा माता आहेत. प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन पद्धतीने आयडिया व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुपला पाठवण्यात येतो त्यानंतर माता त्यांच्या घरी अंगणात मीटिंग घेतात यावेळी काही अडचणी आल्यास प्रथम संस्थेची प्रतिनिधी त्यांना सहकार्य करतात.
हा कार्यक्रम निरंतर चालू राहण्यासाठी साहित्यांच्या सोबत मुलांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेण्यासाठी या साहित्याचा वापर करावा आणि मुलांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची घरातूनच सुरुवात व्हावी आरोग्य, आहार, सोबत पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुरुवात घरातूनच व्हावी हा मानस आहे. गडमुडशिंगी बीट मधील सांगवडे, सांगवडेवाडी, वसगडे, सोनार मळा,हलसवडे येथील 50 गटांच्या लीडर माता आणि सदस्य उपस्थित होत्या. यावेळी सांगवडे च्या सरपंच रूपाली कुंभार, उपसरपंच कल्पना देसाई, सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत, ग्रामपंचायत सदस्य पोपट सिद्धनुरले,हलसवडे च्या सरपंच प्रज्ञा कांबळे, प्रकाश नलवडे यांची भाषणे झाली. प्रथम संस्थेच्या प्रतिनिधी राणी कांबळे, प्रियंका पडळकर प्रथमेश जाधव, दिनेश कांबळे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन सुप्रिया साळवी यांनी केले. साताप्पा बारवाडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com