शिंगणापूर बंधाऱ्यातील मगर वन विभागच्या जाळ्यात

शिंगणापूर बंधाऱ्यातील मगर वन विभागच्या जाळ्यात

Published on

00392
शिंगणापूरला मगरीचे पिलू
वन विभागाकडून बंदीस्त

शिंगणापूर, ता.३ : येथे नदीपात्रात मगरीचे पिलू असल्याचे चर्चा काही दिवसांपासून असल्याने गावात भीतीचे वातावरण होते. अखेर आज वन विभागाने मगरीला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.
ग्रामपंचायत सदस्य अभी बागडे यांचा लहान बंधू पोहायला शिंगणापूर नदीपात्रात गेला असता बंधाऱ्याच्या पाण्यात त्याला काही दिवसांपूर्वी मगरीचे दर्शन झाले होते. ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यात अपयश आले होते. आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मळीचे शेत नावाने प्रसिद्ध असलेल्या रानात शेतात काम करत असणाऱ्या मजुरांना मगरीच्या पिलाचे पुन्हा दर्शन झाले. ही बातमी गावात पसरली आणि बघता बघता परिसरात बघ्यांची गर्दी झाली. भागातील काही नागरिकांनी याबाबतची कल्पना वन विभागाच्या पथकाला दिली. वन विभागाचे पथक घटनास्थळी आले. काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर मगरीला कैद करण्यात ग्रामस्थांच्या सहाय्याने वन विभागाच्या पथकाला यश आले. मगरीला पकडण्यासाठी किशोर पाटील, नाना पाटील, आबा पाटील, अभिजीत पाटील, भीमराव पाटील, अनिकेत जाधव, अक्षय पाटील, टायगर पाटील, शिवराज पाटील, रवी कोळी, युवराज पाटील, आदित्य पाटील यांचे वन विभागाला सहकार्य लाभले. बऱ्याच वर्षांनंतर नदीत मगर आढळल्याने शिंगणापूर गावात चर्चेला उधाण आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.