Mon, Feb 6, 2023

वक्तृत्व स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
Published on : 2 January 2023, 1:45 am
जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा
शाहूनगर : भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकली (ता. करवीर) येथील केंद्र शाळेमध्ये बुधवारी (ता. ४) सकाळी दहा वाजता जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. ही माहिती संयोजक साताप्पा पाटील यांनी दिली. पाचवी ते सातवी गटासाठी ‘शिवचरित्रः एक संस्काराचा धडा’, ‘स्त्रियांवरील वाढता अत्याचारः संरक्षण आणि उपाय’, ‘असा घडवूया महाराष्ट्र’, ‘मी शेतकरी होणार’, ‘माझ्या कल्पनेतील माझा भारत’ असे विषय आहेत. तर आठवी ते दहावी गटासाठी ‘व्यसन सोशल मीडियाचे, पालटले चित्र समाजाचे’, ‘धडपडणारी तरुणाई’ ,‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘देशाच्या विकासात राष्ट्रीय काँग्रेसचे योगदान’, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ हे विषय आहेत.