
पारिताेषिक वितरण साेबत फाेटाे
03031
कौलवला पारितोषिक वितरण
शाहूनगर : ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा सहभाग महत्वाचा आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रबोधन करावे, असे आवाहन कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्थेचे मानद सचिव अनिरुद्ध पाटील कौलवकर यांनी केले. कौलव (ता. राधानगरी) येथील बाळासाहेब पाटील हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली. नूतन सरपंच रामचंद्र कुंभार, उपसरपंच अजित पाटील, सदस्य, रणजीत पाटील, प्रा. विश्वास पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश हुजरे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी महादेव पाटील, ए. के. चौगले, आनंदराव पाटील, सदाशिव हुजरे, राजेंद्र पाटील उपस्थित हाेते. अशोक पनोरीकर सूत्रसंचालन, मुख्याध्यापिका एस. एस. खाडे प्रास्ताविक तर आनंदराव चारापले यांनी आभार मानले.