स्पर्धा साेबत फाेटाे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा साेबत  फाेटाे
स्पर्धा साेबत फाेटाे

स्पर्धा साेबत फाेटाे

sakal_logo
By

03072

शाहू जलतरणच्या विद्यार्थ्यांचे यश
शाहूनगर ः कुरुकली (ता. करवीर) येथील शिवराष्ट्र कला क्रीडा मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त राजर्षी शाहू जलतरण तलावामध्ये झालेल्या स्पर्धेत शाहू जलतरणच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. दुर्वा चव्हाणने तीन सुवर्णपदके मिळवली. उद्घाटन राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. प्रा. डॉ. सुनील खराडे व प्रा. राहुल लहाने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. निकाल असा : १७ वर्षाखालील मुले मिडले रिले प्रथम क्रमांक संस्कार पाटील, मंथन पाटील,आदित्य चौगले, निखिल पोवार, बारा वर्षांखालील मिडले रिले प्रथम क्रमांक आदित्य बरगे, मेघराज डोंगळे, आर्यन पाटील, वरुण डोंगळे. वैयक्तिक खेळ :आदित्य बरगे १०० मीटर बॅक स्ट्रोक, १०० मीटर फ्रीस्टाइल, २०० मी. आय.एम. तृतीय क्रमांक. दुर्वा चव्हाण २५ मी. बॅक स्ट्रोक, २५ मीटर फ्रीस्टाईल, २५ मीटर बटरफ्लाय २५ मीटर ब्रेस स्ट्रोक प्रथम क्रमांक. यावेळी अजित पाटील (कौलवकर), बाजीराव बरगे, गंगाराम बरगे, उत्तम बरगे व मंडळाचे सदस्य उपस्थित हाेते.