व्याख्यान

व्याख्यान

पालकांच्या त्यागाची जाणीव
मुलांनी ठेवावी ः वसंत हंकारे
शाहूनगर ः कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलताना बापाने केलेल्या त्यागाची प्रत्येक मुला-मुलींनी जाणीव ठेवल्यास आजच्या समाजात कुटुंबात असणारी अस्वस्थता दूर होईल, असे प्रतिपादन वसंत हंकारे यांनी केले. कोथळी (ता. करवीर) येथील अचानक स्पोर्टस च्यावतीने रणजीत तात्यासो आमते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त झालेल्या ‘बाप समजून घेताना’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ए. ए. मगदूम होते. श्री. हंकारे म्हणाले, ‘आजच्या समाजव्यवस्थेत मुलांच्या दृष्टिकोनातून बापाचे जीवनातील स्थान कमी होत असून हा चिंतेचा विषय आहे. मुला-मुलींनी बापाचा सन्मान ठेवून त्याच्या त्यागाची आठवण ठेवल्यास समाजातील अनेक प्रश्न निकालात निघू शकतील.’ यावेळी सरपंच सुनीता बुवा, उपसरपंच शरद पाटील, प्रा. पवन पाटील, सागर पाटील, शिवाजी पाटील, धीरज आमते, सतीश बुवा, उदय पाटील, प्रशांत पाटील, राहुल आमते, विशाल पाटील, अक्षय बुडके, प्रथमेश पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com