ग्रामसभा

ग्रामसभा
Published on

कौलवचा एमआयडीसी
प्रकल्प त्वरित रद्द करावा

ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर

शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथे होणारा नियोजित एमआयडीसी प्रकल्प त्वरित रद्द करावा, या मागणीचा ठराव कौलव येथे झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र कुंभार होते. राज्य शासनाने ग्रामस्थांचा विरोध डावलून ग्रामपंचायतला विश्वासात न घेता येथे एमआयडीसी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र शासनाच्या निर्णयाला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. त्यासाठी निवेदन, साखळी उपोषण, बेमुदत उपोषण आदी मार्गांनी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एमआयडीसीविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. एमआयडीसी त्वरित रद्द करावी; अशा मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रकल्प रद्द न केल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सभेला भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील, माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, चंद्रकांत पाटील, रविश पाटील, सुशील पाटील, के. द. पाटील, बाबूराव पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वास पाटील, उपसरपंच सरिता पाटील, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक एस. डी. आरडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com