

कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील
गावांमध्ये निवारा शेड बांधा
शाहूनगर, ता. २४ ः कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील अनेक गावांतील बसस्थानकांवर प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. एस.टी. महामंडळाने या ठिकाणी निवारा शेड बांधावीत, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील वाशी, नंदवाळ फाटा, कांडगाव, देवाळे, हळदी, सडोली फाटा, परिते, ठिकपुर्ली फाटा, घोटवडे, भोपळेवाडी फाटा, सिरसे, आवळी बुद्रुक, आणाजे आदी गावांमधील बसस्थानकांवर निवारा शेड नाहीत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हा-पावसात उभा राहून एस.टी.ची प्रतीक्षा करावी लागते. या मार्गावर वेळेत एस. टी. गाड्या येत नसल्यामुळे अनेक वेळा तासतासभर प्रवाशांना एखाद्या झाडाचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही एस.टी. प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. एस. टी. महामंडळाने याची गांभीर्याने दखल घेऊन मार्गावरील सर्व गागांतील बसस्थानकांवर निवारा शेड बांधावीत, अशी मागणी प्रवाशी व ग्रामस्थांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.