
रा. बा. पाटील विधालयाचा राजवर्धन शिंदे राज्य गुणवत्ता यादीत.
01396
राजवर्धन शिंदेचे ड्रॉइंगमध्ये यश
सोनाळी : कलासंचलनालय, मुंबईतर्फे घेतलेल्या शासकीय रेखाकला ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचे, रा. बा. पाटील विद्यालय सडोली खालसा ( ता. करवीर) शाळेचा विद्यार्थी राजवर्धन रावसाहेब शिंदे राज्य गुणवत्ता यादीत २२ वा आला. त्याला डिझाइनमध्ये विशेष पारितोषिक जाहीर झाले. त्याचा जनरल बॉडी सदस्य, माजी आमदार संपतराव पवार -पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. परीक्षेसाठी महाराष्ट्रातून सहा लाख विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला असून क्रांती पाटील व सोनिया कांबळे यांना ए ग्रेड मिळाली. ४१ विद्यार्थ्यांनी बी ग्रेड मिळविली. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक आर. व्ही. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक आर. बी. नेर्लेकर,पर्यवेक्षक, आर. व्ही. कुंभार यांच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. स्कूल कमिटी सदस्य अशोकराव पवार-पाटील, भगतसिंग पवार- पाटील, बाळासाो साळोखे, विक्रमसिंह पवार- पाटील यांचे सहकार्य मिळाले.