Wed, March 29, 2023

बाचणी येथील महिलेचा विहीरीत पाय घसरून पडल्याने मुत्यु.
बाचणी येथील महिलेचा विहीरीत पाय घसरून पडल्याने मुत्यु.
Published on : 8 March 2023, 6:56 am
01467
...
बाचणीत विहिरीत पाय
घसरून विवाहितेचा मृत्यू
सोनाळी ः बाचणी (ता.करवीर) येथे विहिरीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी(ता.८) सकाळी सातच्या दरम्यान घडली. शोभा नामदेव पाटील (वय ४८) असे या महिलेचे नाव असून या घटनेची नोंद करवीर पोलिसांमध्ये झालेले आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळाली माहिती अशी, शोभा पाटील या आपल्या घराशेजारी असणाऱ्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूत असताना अचानक त्यांचा पाय घसरून तोल गेला व त्या विहिरीत पडल्या. विहीरच्या आसपास कोणी नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती , मुलगा, मुलगी असा परिवार आहे