लक्ष्मी पाटील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत पाटील

लक्ष्मी पाटील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत पाटील

Published on

01634
रामचंद्र सावरतकर
01635
बळवंत पाटील

लक्ष्मी पाटील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत पाटील
सोनाळी : हळदी (ता. करवीर) येथील लक्ष्मी तातोबा पाटील बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्ती खरेदी-विक्री संघाचे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळवंत तातोबा पाटील, तर उपाध्यक्षपदी रामचंद्र भाऊसो सावरतकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस. बी. कुलकर्णी होत्या. बिनविरोध संचालक असे; जयदीप पाटील, भगवान पाटील, सदाशिव शेटे, अरुण कांबळे, बंडोपंत गुरव, सर्जेराव चिंदके, यशवंत चव्हाण, राधाबाई कामते. या वेळी हळदी विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव साठे, उपाध्यक्ष धनाजी जाधव, बाबासाहेब पाटील, माजी उपसरपंच शंकर पाटील आदी उपस्थित होते. व्यवस्थापक सीताराम पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.