भोगावती साखर कारखांना बिनविरोधसाठी कोणाचेही वावडे नाही.आमदार पी.एन. पाटील. सडोलीकर.

भोगावती साखर कारखांना बिनविरोधसाठी कोणाचेही वावडे नाही.आमदार पी.एन. पाटील. सडोलीकर.

01858
कुरुकली ः येथे मेळाव्यास मार्गदर्शन करताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील .व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
...
‘भोगावती’ बिनविरोध करण्यासाठी
आम्हाला कोणाचेही वावडे नाही

पी. एन. पाटीलः कुरुकली येथे मेळावा

सोनाळी, ता. १३ः ‘कोणत्याही प्रकारची उपपदार्थ निर्मिती नसतानाही आर्थिक अडचणीतील भोगावती साखर कारखाना सक्षमपणे चालवला आहे. काटकसर व पारदर्शक कारभार करत ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचे काम प्रामाणिकपणे केले आहे. भोगावती कारखाना सुरळीतपणे मार्गावर आणण्यासाठी आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्हाला कोणाचेही वावडे नाही,’ असे प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी एन पाटील यांनी केले. दरम्यान, डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्पही सुरु करणार असून कारखाना लवकरच कर्जमुक्त होणार आहे. त्यामुळे सभासदांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले .
कुरुकली (ता. करवीर) येथे भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर व संचालक प्रा शिवाजीराव पाटील यांनी गेल्या सहा वर्षात कारखान्याचा कारभार सभासद व कर्मचारी हिताचाच केला असून विरोधक खोटे नाटे आरोप करून सभासदांची दिशाभूल करत आहेत. या अपप्रचाराला सभासदांनी बळी पडू नये, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, संदीप पाटील, साताप्पा पाटील, बाळासाहेब कारंडे, माजी संचालक वसंतराव पाटील, शिवाजीराव तळेकर, शंकरराव पाटील, बबन रानगे, सरपंच रोहित पाटील आदी उपस्थित होते .आभार संचालक पांडूरंग पाटील यांनी मानले .
...
चौकट
‘भोगावती’ च्या पाठीशी ठामपणे उभा
‘१९८९ पासून भोगावती साखर कारखान्याचे नेतृत्व केले असून गेल्या सहा वर्षात कारखाना मार्गावर आणण्यासाठी जिवाचे रान केले आहे . त्यामुळे मी निवडणूक रिंगणात नसलो तरी ‘भोगावती’ चे सभासद व कामगारांच्या हितासाठी मी ‘भोगावती ’च्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभा आहे’, असा विश्वास पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com