करवीरच्या पश्चिम भागात भात पेरणी   अंतिम टप्प्यात.

करवीरच्या पश्चिम भागात भात पेरणी अंतिम टप्प्यात.

02631
भात पेरणी अंतिम टप्प्यात
सोनाळी ः करवीरच्या पश्चिम भागात भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाची चाहूल लागल्याने पेरणी साधण्यासाठी शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात लगबग चालू झाली आहे. मॉन्सूनपूर्व वारे वाहू लागल्याने शेतकरी भात पेरणी करून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी दहा जूनपर्यंत मॉन्सून पाऊस महाराष्ट्र व्यापणार, असे संकेत हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतातील कामे शेतकरी वर्गाने बऱ्यापैकी आवरली आहेत. परिसरात यंदाच्या उन्हाळ्यात वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी एकच वळीव पाऊस झाला होता. त्यामुळे पाण्यासाठी आसुसलेल्या जमिनी शांत होऊन मशागतीसाठी चांगल्या पद्धतीची चालना मिळाली. खरीप हंगामाच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांनी भात पेरणी बऱ्यापैकी साधली आहे. भुईमूग, सोयाबीनसह इतर पिके घेण्यासाठी शेतामध्ये सरी सोडून इतर कामे पूर्ण केली आहेत. मृग नक्षत्र आल्याने ऊस पिकांच्या कामांची धांदल उडाली आहे. मागास लावणींच्या भरणी करणे, औषध फवारणी, भांगलणी, पाला खडसणे यासह इतर कामे वेगाने आटोपली जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com