जिल्हा परिषदतीत दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे मिळण्याचा मार्ग मोकळा., संघटनेला यश हायकोर्टाच्या आदेशानंतर शासन निर्णय जारी.

जिल्हा परिषदतीत दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे मिळण्याचा मार्ग मोकळा., संघटनेला यश हायकोर्टाच्या आदेशानंतर शासन निर्णय जारी.

02394
जिल्हा परिषद
दिव्यांग कर्मचाऱ्यांना
मिळणार उपकरणे
सोनाळी ः शासन्मान्य महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेला मोठे यश प्राप्त झाले आहे. राज्यात सर्व जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना स्कूटर विथ ॲडॅप्शन व सहाय्यक उपकरणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष रवींद्र पाटील व राज्य सचिव परमेश्वर बाबर यांनी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ रिट याचिका दाखल केली होती. ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय व वित्त विभागांच्या संमतीने हा निर्णय निर्गमित केला. यामुळे जिल्हा परिषदेकडील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे मिळण्याबाबत लेखाशीर्ष मंजूर करून लाभाचा मार्ग मोकळा झाला. रवींद्र पाटील व परमेश्वर बाबर यांनी दहा वर्षांपासून पाठपुरावा केल्याने दिव्यांग कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी सांगितले. दिव्यांग कायदा १९९५ व दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे-जाणे सोयीचे होण्यासाठी त्यांना सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे पुरवणे शासनाची जबाबदारी आहे; असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार शासन निर्णय जारी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com