वाशीतील शिवेवरील बिरदेव मंदिरात पहिली भाकणूक हजारो भाविक भक्तांच्या उपस्थित संपन्न.
02638
निवडणुकांच्या तोंडावर
राजकारणात बंडाळी माजेल. पालखी सोहळा उत्साहात,नवरात्रास प्रारंभ.
सोनाळी, ता. ३ : विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होतील,वर्चस्व वादातून पक्षांतर्गत बंडाळी
माजेल,राजकारण्यांच्या वेळ काढून पणामुळे जातीय आरक्षणाचा वाद वाढेल,याचा फटका राजकारण्यांना बसेल,दहशतवादी पाकिस्तान देश हळूहळू संपुष्टात येईल,नेत्यांच्या वर्चस्व वादातून दिल्लीच्या गादीला हादरा बसेल,पण गादी टिकून राहील, जगाच्या पाठीवर भारत महासत्ता बनेल.अशी भाकणूक भगवान पुजारी व भागोजी रानगे यांनी वाशी ( ता. करवीर ) येथील शिवेवरील बिरदेव मंदिरात केली.महाराष्ट्रातील यंदाची हि पहिली भाकणूक हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
श्रींचा पालखी सोहळा जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे,मुरली पाटील, उपसरपंच सीमा पाटील,धनगर समाज बांधव,मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भाणूस व मुख्य मंदिरातून शिवेवरील बिरदेव मंदिरात गेला. यावेळी बिरदेवाच्या नावानं चांगभलं चा गजर करत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.दरम्यान धनाजी बनकर यांच्यासह बनकर बांधवांनी हेडाम खेळले.देवस्थानचे देवऋषी भगवान पुजारी व भागोजी रानगे यांची भाकणूक झाली.निसर्गाचा समतोल बिघडत आहे,पावसाळा,हिवाळा,उन्हाळा हे ऋतुमान चक्र जनतेला हवालदिल करेल,निसर्ग जनतेला बापडे करेल,डोंगर पर्वत वसरून जातील,सर्वत्र जळमळ पाणी होईल,गुन्हेगारी वाढेल,राज्यकर्त्यांच्या दहशतीमुळे जनतेचा
न्यायदेवतेवरील विश्वास उडेल,खऱ्याने वागशीला टिकून राहशीला, जो मनापासून माझी सेवा,भक्ती करेल त्याला पोटाशी धरीन त्याचा सांभाळ करून त्याच्या कुटुंबाचा उद्धार करेन यासह अनेक विषयांवर त्यांनी जगाचे,देशाचे भविष्य भाकीत केले.
सीमेवरील बिरदेव मंदिरातून पालखी सोहळा नानासो पाटील यांच्या घरी आला.यावेळी जय शिवराय तालीम मंडळ,पाटील गल्ली यांचे वतीने सडा रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केले.तसेच आकर्षक आतषबाजी करण्यात आली.बिरदेवाच्या नावानं चांगभलं, भंडाऱ्याच्या उधळणीत रात्रभर धनगरी ओव्या, ढोल कैताळाच्या निनादात पालखी सोहळा मुख्य मंदिरात जाऊन पहाटे घटस्थापना झाली.
यावेळी अध्यक्ष रघुनाथ पुजारी, उपाध्यक्ष रंगराव रानगे,मल्हार सेना सेनापती बबनराव रानगे,माजी अध्यक्ष बिरु धनगर,भागोजी पुजारी,आनंदा पुजारी,भगवान पुजारी,आनंदा रानगे,संतोष रानगे,वसंत पुजारी,सुभाना रानगे,सूर्याप्पा हजारे,कृष्णात लांडगे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

