विधा मंदीर सडोली दुमाला शाळेत  तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न.

विधा मंदीर सडोली दुमाला शाळेत तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न.

Published on

02867
सडोली दुमाला विद्यामंदिरात
तृणधान्य पाककला स्पर्धा

सोनाळी, ता. १८ ः विद्यामंदिर सडोली दुमाला (ता. करवीर) येथील शाळेत तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित केल्या होत्या.फास्ट फूडच्या जमान्यात मुलांच्या शरीरात अनेक जीवनसत्वे कमी पडत आहेत. कुटुंबापासून याची जाणीव व्हावी म्हणून स्पर्धेचे आयोजन शाळास्तरावर करण्याचे परिपत्रक जिल्हा परिषदेने काढले आहे. स्पर्धेत ५० हून अधिक महिला पालकांनी सहभाग घेतला.
गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणी, वरी, मका, राजगिरा, सावा, राळा, जवस, सातू, ओट्स आदी धानयांपासून थालीपीठ,आंबील, मोदक, भाकरी, आंबोळी, मेटुकुली, खीर, ढोसा, भाकरवडी वड्या, इडली, आपे, ढोकळा, राळे भात, करंज्या, ज्वार उसळ, नाचणी लाडू असे अनेक पदार्थ बनवून सजवून आणले होते. सुरेखा नलवडे, मुख्याध्यापक एकनाथ कुंभार यांनी आहारातील तृणधान्याची आवश्यकता व फास्ट फूडची घातकता यावर मार्गदर्शन झाले. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच अभिजित पाटील, सखी सावित्री समितीच्या समुपदेशक पल्लवीताई पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माणिका भोसले, उपाध्यक्ष अशोक कांबळे, रेश्मा कांबळे, अलका गुरव, अतुल कांबळे, भीमराव केसरकर, भाऊसो भोसले, शहाजी सुतार, विक्रम पाटील, संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत झाले. मूल्यांकन अध्यापिका स्मिता पाटील, रूपाली कुंभार, पूजा कामते, तेजस्विनी शिंदे यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी अभिजित पाटील, द्वितीय क्रमांक कल्पना विश्वनाथ देसाई, तृतीय क्रमांक माणिका भाऊसाहेब भोसले .उत्तेजनार्थ रेश्मा रामदास कांबळे व माधुरी धनाजी कुंभार यांची निवड झाली. मुख्याध्यापक एकनाथ कुंभार यांनी स्वागत तर चंद्रकांत थोरवत यांनी आभार मानले. यावेळी महादेव खोंद्रे, भीमराव पाटील, विठाबाई कांबळे, अश्विनी पोवार, योगिता निकम, पालक, विद्यार्थी उपस्थित होते .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com