उत्तरकार्यानिमित्त शाळेत दप्तर भेट पेडणेकर कुटुंबियांचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तरकार्यानिमित्त शाळेत दप्तर भेट पेडणेकर कुटुंबियांचा उपक्रम
उत्तरकार्यानिमित्त शाळेत दप्तर भेट पेडणेकर कुटुंबियांचा उपक्रम

उत्तरकार्यानिमित्त शाळेत दप्तर भेट पेडणेकर कुटुंबियांचा उपक्रम

sakal_logo
By

01963
अर्जुनी ः विद्यार्थ्यांना दप्तर देताना पेडणेकर कुटुंबीय, शिक्षक व पदाधिकारी.

उत्तरकार्यानिमित्त
शाळेत दप्तर भेट
सेनापती कापशी ः अर्जुनी (ता. कागल) येथील माजी सरपंच विद्या कृष्णात पेडणेकर यांच्या उत्तरकार्यानिमित्त पेडणेकर कुटुंबीयाकडून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर भेट देण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच सुनील देसाई होते. मुगळीत कृष्णात पेडणेकर यांनी बालिका दिन व पत्नीच्या उत्तरकार्याचे औचित्य साधून लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयातील 150 विद्यार्थ्यांना दप्तर देऊन कै. पेडणेकर यांचा समाजसेवेचा वारसा जपला. उपक्रमाचे श्री. देसाई यांनी कौतुक केले. कै. पेडणेकर यांनी प्रादेशिक पर्यटनात समावेश, पिण्याच्या पाण्याची सुविधा, डिजिटल स्कूल, रस्ते अशी विकासकामे केली. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या उत्तरकार्यानिमित्त हा उपक्रम राबविला. रणजीत देसाई, कृष्णात पेडणेकर, संजय पेडणेकर, मोहन चौगुले, सुदाम देसाई, प्रशांत चौगुले, दत्तात्रय चौगुले, नामदेव खराडे, मुख्याध्यापक शंकर पाटील, कृष्णा बागडी, अर्चना गोरुले, शबाना मुजावर उपस्थित होते. नामदेव चौगुले यांनी आभार मानले.