नवीन बातमी ...मूळक्षेत्र मेतकेत शुक्रवारी बाळूमामांचा भंडारा उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन बातमी ...मूळक्षेत्र मेतकेत शुक्रवारी बाळूमामांचा भंडारा उत्सव
नवीन बातमी ...मूळक्षेत्र मेतकेत शुक्रवारी बाळूमामांचा भंडारा उत्सव

नवीन बातमी ...मूळक्षेत्र मेतकेत शुक्रवारी बाळूमामांचा भंडारा उत्सव

sakal_logo
By

B02046
मेतकेत बाळूमामांचा
उद्यापासून भंडारा उत्सव
सेनापती कापशी, ता. १ : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू बाळूमामा यांचा मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथे शुक्रवारी (ता. ३) भंडारा उत्सव होत आहे. बाळूमामा यांनी स्वतः १९३२ मध्ये उत्सव सुरू केल्याने विशेष महत्त्व आहे. भंडारा उत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.
कौलवमधील कै. कृष्णराव पाटील(कौलवकर) यांनी दिलेल्या सोन्याच्या तारांनी विणलेल्या कणातीच्या भव्य तंबूत सुरू झालेल्या भंडारा उत्सवाने भव्य स्वरुप धारण केले आहे. सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने नियोजन केले आहे. उत्सवात शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी ५.३० वा. भगवान डोणे (वाघापूर) यांची भाकणूक, मिरज, टाकळी, बेडग आदी २५ गावांच्या वालंगांचे आगमन, सायंकाळी सात वाजता पालखी पूजन व देवाचा सबिना, धनगरी ढोल व हेडामचा कार्यक्रम, पहाटे चार वाजता भाकणूक, शनिवारी (ता. ४) सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सांगता, नऊ वाजता काल्याचे कीर्तन व दहा वाजता नैवेद्य व महाप्रसाद आणि संध्याकाळी ५.३० वा. दिंडी असे नियोजन आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.