
बेनिक्रे सरपंच विरोधात अविश्वास ठराव मंजूर
बेनिक्रे सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर
सेनापती कापशी, ता २९: बेनिक्रे (ता. कागल) येथील राजे गटाच्या सरपंच अश्विनी पांडूरंग गुरव यांच्या विरोधात सात सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो आज सात विरुद्ध एक मताने मंजूर झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार शिल्पा ठोकडे होत्या. सदस्यांना विश्वासात घेतले नाही, दोन वर्षे पंधराव्या वित्त आयोगातील ३० लाख रक्कम शिल्लक ठेवली, धनादेशावर स्वाक्षरी न करणे, विकासकामांना ठराव न देणे अशा अनेक कारणांसाठी त्यांच्याविरोधात अविश्वास मंजूर करण्यात आला. यावेळी उपसरपंच सूर्याजी जाधव, सदस्य सचिन वाडकर, बाजीराव कांबळे, कृष्णा जाधव, छाया कळके, अमिता पालकर, मनीषा पाटील तसेच तलाठी दत्तात्रय माने, ग्रामसेवक स्मिता सूर्यवंशी, पोलीस पाटील निलेश पाटील आदी उपस्थित होते. नऊ पैकी एक सदस्य उपस्थित राहिला नाही.