नंद्याळ येथे बांधावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नंद्याळ येथे बांधावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Published on

02164
नंद्याळला बांधावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
सेनापती कापशी : नंद्याळ (ता. कागल) येथील शेतकऱ्याचा शेतातील बांधावरून घसरून पडून मृत्यू झाला. नामदेव कृष्ण सुतार (वय ७४) असे त्यांचे नाव आहे. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घटना घडली. मुरगूड पोलिसात घटनेची नोंद झाली. नामदेव सुतार हे आज दुपारी नंद्याळ ते कापशी रस्त्यालगतच्या सुतारकी नावाच्या शेताकडे गेले होते. यादरम्यान त्यांचा बांधावरून घसरून पडून जागीच मृत्यू झाला. त्यांचा नातू करण गजानन सुतार साडेपाचला शेताकडे गेल्यानंतर ही घटना लक्षात आली. मृत नामदेव सुतार यांचा मुलगा गजानन सुतार यांचाही यापूर्वीच मृत्यू झाल्याने नामदेव सुतारच कर्ते पुरुष होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com