सभासदांचे सहकार्य अपेक्षित

सभासदांचे सहकार्य अपेक्षित

सभासदांचे सहकार्य अपेक्षित
वेदगंगेतून पाणी उपसा करताना भारनियमन, उपसाबंदी यामुळे आठ तासच पाणी मिळते. दोन वर्षांपूर्वीच १६ तास विजेचा स्वतंत्र फिडरचा आराखडा केला. मात्र, या खर्चाला काही शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र, आता त्याची गरज भासत आहे. एकरी पाणीपट्टीत थोडीशी वाढ करून तसेच शासनाच्या मदतीने डोंगरातून दौलतवाडीकडे जाणारे पाणी प्रकल्पाकडे वळवणे, प्रकल्पाखाली वाया जाणारे पाणी पुन्हा प्रकल्पात टाकणे, कालव्यांची व पोटकालव्यांची दुरुस्ती, अस्तरीकरण, पोट कालव्यांना पाईप बसवून पाणी वाचवणे अशा योजना राबवायल्या हव्यात. संस्था टिकली पाहिजे, तसेच शेतकऱ्यांना योग्य दरात पुरेसे पाणीही मिळाले पाहिजे. यासाठी आम्ही तत्पर असून, लोकांचे सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचे ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्थेचे गणपती इंगळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com