सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट को- जनरेशन पॉवरप्लांट राष्ट्रीय पुरस्कार

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट को- जनरेशन पॉवरप्लांट राष्ट्रीय पुरस्कार
Published on

घोरपडे साखर कारखान्याला
को-जनरेशन पॉवरप्लांट पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. ३ : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवरप्लांट हा विशेष पुरस्कार जाहीर झाला. को-जनरेशन असोसिएशनने ही घोषणा केली. या पुरस्कारामुळे कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेवर यशस्वी मोहर उमटविल्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सांगितले.
को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने दिला जाणारा सन २०२३-२४ साठीचा पुरस्कार आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत होणाऱ्या खास कार्यक्रमात याचे वितरण होणार आहे. यामध्ये सहवीज प्रकल्प राबविणाऱ्या आदर्शवत संस्था व अधिकाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार मिळण्यात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांचे काटेकोर व नियमित मार्गदर्शन, अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे शिस्तबद्ध नियोजन आणि दररोजचा संपर्क याचा मोठा वाटा आहे. पुरस्काराबद्दल हसन मुश्रीफ, नवीद मुश्रीफ, जनरल मॅनेजर संजय घाटगे, को-जनचे मिलिंद पंडे, बी. ए. पाटील, भूषण हिरेमठ, अधिकारी व कामगारांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com