

03555
जिल्हा क्षयरोग मुक्तसाठी विशेष अभियान
शिल्पा खोत ः सेनापती कापशीतून प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. १६ : ‘जिल्हा क्षयरोगमुक्त होण्यासाठी शंभर दिवसांचे विशेष अभियान राबवले जात आहे. क्षयरोग केवळ आजार नसून सामाजिक प्रश्न आहे. योग्य वेळी उपचार घेतले तर आजार पूर्ण बरा होतो. ग्रामीण भागात प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी आणि २०२६ पर्यंत जिल्हा क्षयरोग मुक्त करावा,’’ असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी केले.
शंभर दिवसांच्या विशेष अभियानाची सुरुवात खोत यांच्या हस्ते येथे झाली. त्यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रात एक्स-रे मशीनचे उद्घाटन झाले.
खोत म्हणाल्या, ‘अभियानात संशयित रुग्णांची एक्स-रे मशीनद्वारे विशेष तपासणी होईल. सुविधेचा रुग्णांनी लाभ घ्यावा. ग्रामपंचायत सदस्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.’
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वेदक म्हणाले, ‘क्षय रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी लोकप्रतिनिधीनी रुग्णांना दत्तक घ्यावे. रुग्णांना मोफत औषधोपचार आणि सकस आहाराची ‘निक्षय पोषण योजना याची माहिती करून द्यावी. कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे आणि एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जनजागृतीच अभियानाची खरी ताकद आहे.’
पंचायत समिती सदस्य सुनीता माळी व दीपक सोनार, सरपंच उज्वला कांबळे, डॉ. फारुख देसाई, डॉ. निहाल शेख, आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जयसिंग खोत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रमोद धामणकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.