कोल्हापूर बंगलोर विमान रद्द

कोल्हापूर बंगलोर विमान रद्द

83504
शाहू नाका ः कोल्हापूर विमानतळावर कोल्हापूरहून बंगळुरूकडे जाणारे खासगी प्रवासी विमान सोमवारी अचानक रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.
...
कोल्हापूर-बंगळुरू विमान अचानक रद्द

प्रवाशांना मनस्ताप : पाच तास प्रवाशांना विमानतळावर प्रतीक्षा

शाहू नाका, ता.१३ ः  कोल्हापूर-बंगळुरूकडे जाणारे खासगी प्रवासी विमान सोमवारी रात्री कोणतीही पूर्वकल्पना न देता विमान रद्द केल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला. तब्बल पाच तास प्रवाशांनी विमानतळावर प्रतीक्षा केल्यानंतर विमान रद्द केल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
कोल्हापूर विमानतळावरून सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बंगळुरूकडे जाणारे खासगी कंपनीचे प्रवासी विमान रात्री साडेआठच्या सुमारास खराब हवामानामुळे रद्द करण्यात येत आल्याचे कारण प्रवाशांना देण्यात आले; मात्र विमानतळ प्रशासनाच्या वतीने संबंधित खासगी प्रवासी विमान वैमानिकांच्या फ्लाईट ड्यूटी वेळेच्या मर्यादेमुळे रद्द झाले, असे सांगण्यात आले. यामुळे नेमके विमान कशामुळे रद्द झाले, याबाबत संग्दिग्धता निर्माण झाली होती. कोल्हापूर विमानतळावरून सायंकाळी ४.५५ मिनिटांनी कोल्हापूर-बंगळुरूकडे विमान जाणार होते. यामध्ये सुमारे पन्नासच्यावर प्रवासी होते. हे प्रवासी दुपारी साडेतीन वाजल्यापासून विमानतळावर आले होते. विमानतळावर चेक-इन केल्यानंतर काही वेळातच विमान एक तासाहून अधिक काळ विलंब होणार असल्याचे प्रवाशांना संबंधित खासगी विमान कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. एक तासानंतर विमान दोन तास उशिरा आहे, असे सांगण्यात आले. तब्बल पाच तास प्रतीक्षा केल्यानंतर अचानकपणे रात्री साडेआठच्या सुमारास विमान रद्द झाले, असे सांगण्यात आले. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यातच विमानतळावरील संबंधित विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे प्रवाशांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले होते. 
अचानक विमान रद्द झाल्याने आता पुढे काय करायचा, असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडला होता. यावेळी संबंधित खासगी विमान कंपनीच्या वतीने प्रवाशांना परतावा दिला जाईल, किंवा उद्या मंगळवारी दुपारी विमान निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
...


चढ्या दराने वाहतूक 
रात्री अचानक विमान रद्द झाल्याने नातेवाइकांना नेण्यासाठी विमानतळावर प्रवासी बोलवण्यात येत होते, मात्र काही प्रवासी परराज्यातील होते. सकाळी पुन्हा लवकर विमान असल्याने अन्य ठिकाणी जाणे शक्य नसल्याने कोल्हापुरात मुक्कम करणे पसंत केले, मात्र विमानतळावरून शहारातील हॉटेलवर जाण्यासाठी काही खासगी वाहने व रिक्षाचालकांनी जादा दराने पैसे घेण्यात आले. नाईलाजाने त्यांना जादा दर देऊन शहारातील हॉटेलवर जावे लागेल.


शाहू नाका ः कोल्हापूर विमानतळावर कोल्हापूरहून बंगळुरूकडे जाणारे खासगी प्रवासी विमान सोमवारी अचानक रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com