शाहू नाक्यावरील बस थांब्याचे योग्य नियोजन करा

शाहू नाक्यावरील बस थांब्याचे योग्य नियोजन करा

Published on

00405
शाहू नाक्यावरील बस
थांब्याचे नियोजन करा

मराठा महासंघांची मागणी; उजळाईवाडी ग्रामपंचायतीला निवेदन

शाहू नाका, ता. ७ : शाहू नाका येथील उड्डाण पुलाजवळील एसटी बस थांब्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी याबाबत राज्य परिवहन महामंडळ यांच्याशी संपर्क करून योग्य ते नियोजन केले जाईल; असे अश्वासन शिष्टमंडळाला दिले.
शाहू नाका येथे रस्त्याच्या मध्येच बस थांबा असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन एस.टी पकडावी लागते .याबाबत सविस्तर वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन मराठा महासंघाच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील म्हणाले, ‘शाहू नाका येथील उड्डाण पुलाच्या सुरुवातीला एसटीमध्ये प्रवसी चढ-उतार करत असतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना अंदाज येत नसल्याने सतत याठिकाणी अपघात होत आहेत.
महिला अध्यक्षा शैलजा भोसले म्हणाल्या, ‘भविष्यात गंभीर अपघात घडण्यापूर्वीच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किमान उड्डाणपुलाच्या अलीकडे रस्त्यांच्या डाव्याबाजूला विनंती बस थांब्याचे नियोजन करावे. याबाबत जर योग्य कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. शिष्टमंडळात संजोगिता देसाई, राघिनी चव्हाण- पाटील, मंगल कुऱ्हाडे, उज्वला पंतोजी, सुनंदा भिंगुडे, सुनीता पाटील, सुशीला कासारकर, विजया पाटील, जयसिंग हवालदार, विजयसिंह देसाई उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com