सोळांकूर

सोळांकूर

Published on

03600
मोघर्डेची सून झाली पोलिस उपनिरीक्षक
सोळांकूर, ता. ११ : मोघर्डे, (ता. राधानगरी) येथील यशोदा अविनाश पाटील हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने झालेल्या स्पर्धा परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.
ती पंचायत समिती राधानगरीचे माजी शिक्षणविस्तार अधिकारी कै .डी .डी पाटील यांची सून आहे. यशोदाचे माहेर चंद्रे (ता. राधानगरी) असून प्राथमिक शिक्षण चंद्रे येथे पूर्ण केले तर माध्यमिक शिक्षण रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल; कसबा वाळवा येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण दूधसाखर विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज व दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथून बीएस्सी शिक्षण पूर्ण करून शिवाजी विद्यापीठातून एमएस्सीची पदवी प्राप्त केली. यशोदाचे पती अविनाश धोंडीराम पाटील पुणे येथील आयटी कंपनीत कार्यरत आहेत. यशोदाने स्पर्धा परीक्षा तयारी पुणे येथे केली असून दुसऱ्याच प्रयत्नात तिला यश मिळाले. त्यांना कुटुंबीयांसह आयडियल अकॅडमी, म्हासूर्ली सरदार भित्तम, अमोल पाटील, वडील बाजीराव पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.