किसनराव मोरे ट्रस्टच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

किसनराव मोरे ट्रस्टच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

किसनराव मोरे ट्रस्टच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सरवडे, ता.२ : बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार किसनराव मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील किसनराव मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी पाच क्षेत्रांतील आदर्श व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. यावर्षी १४ मे रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत आदर्श काम केलेल्या व्यक्तींनी आपले प्रस्ताव ट्रस्टकडे पाठवावेत, असे आवाहन केले आहे.
किसनराव मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी समाजातील पाच व्यक्तींची निवड केली जाते. यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शेती, समाजकार्य व महिला बचत गट यांचा समावेश आहे. या पाच क्षेत्रांत काम केलेल्या व्यक्तींनी आपल्या आदर्श कार्याचे प्रस्ताव ट्रस्टकडे पाठवावेत, असे आवाहन केले आहे. पात्र प्रस्तावाची पुरस्कारासाठी निवड केली जाणार असून, किसनराव मोरे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात पुरस्कार वितरण केले जाणार आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव पाठविण्यासाठी निवृत्त प्राचार्य पी. एस .पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com